अखेर गंगेत घोडं न्हालं….

fadnvis
मुंबई : विधानसभा निवडणुकी दरम्यान एकमेकांवर गंभीर आणि मने दुखवली जातील अशी वक्तव्ये केल्यानंतर शिवसेना आणि भाजपने आपला संसार पुन्हा थाटला आहे. त्याचीच प्रचिती म्हणून आज शिवसेनेच्या १० शिलेदारांसह भाजपच्या १० आमदारांनी आपल्या मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यात भाजप आणि सेनेच्या प्रत्येकी ५ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्र्य़ांचा समावेश आहे.

दिवाकर रावते, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि डॉ.दीपक सावंत यांनी शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपच्या गिरीश बापट, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, बबन लोणीकर आणि राजकुमार बडोले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

तर शिवसेनेच्या विजय शिवतारे, दीपक केसरकर, रविंद्र वायकर, संजय राठोड, दादा भूसे आणि भाजपच्या विजयकुमार देशमुख, राम शिंदे, प्रवीण पोटे, राजे अंबरीशराजे आत्राम, रणजित पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेत मंत्रिमंडळात प्रवेश केल्यामुळे २५ वर्षापूर्वी जुळलेले सुत पुन्हा एकदा मजबूत झाले आहे.

Leave a Comment