जगातील फास्टेस्ट टूडी कॅमेरा विकसित

camera
वॉशिंग्टन – सेकंदाला 100 अब्ज फ्रेम्स घेऊ शकणारा जगातला सर्यात वेगवान टूडी कॅमेरा तयार करण्यात अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठातील बायोमेडिकल इंजिनिअरिंग विभागाला यश आले आहे.

या संबंधी माहीती देताना या प्रकल्पाचे प्रमुख प्रो. लिहोंगवांग यांनी सांगितले की, हा कॅमेरा तयार करताना कॉम्प्रेसस्ड अल्ट्राफास्ट फोटोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यामुळे सिंगल लेसर शॉट इमेज घेता येते.उच्च शक्तीच्या मायक्रो टेलिस्कोपमध्ये या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते. सध्या जगात जो सर्वाधिक वेगवान कॅमेरा आहे त्याचा वेग सेकंदाला 1कोटी फ्रेम्स इतका आहे. नवीन तयार केलेला कॅमेरा याच्यापेक्षा 100 पट अधिक वेगवान आहे.

याचा उपयोग बायोमेडिकल, खगोलशास्त्र आणि फोरेन्सिक साठी फार महत्त्वाचा ठरणार आहे असेही त्यांनी सांगितले.या तंत्रज्ञानामुळे प्रथमच माणसाला माशीसार‘या किटकावरील लाईट पल्स प्रथमच पाहता आल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment