गरज सरो आणि वैद्य मरो

mahayuti
मुंबई – आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत असून भाजपची बहुमत सिध्द करण्याची चिंता शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्या मिटली असली तरी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठया विश्वासाने साथ देणारे मित्रपक्ष भाजपवर नाराज झाले आहेत.

भाजपच्या मित्रपक्षांना ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीचा त्यांना येत असून विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेप्रमाणेच मित्रपक्षांनाही सत्तेचे गाजर दाखवून भाजपने झुलवत ठेवले होते.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात आपल्या संधी मिळेल अशी मित्रपक्षांना अपेक्षा होती. मात्र आज होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना स्थान मिळण्याची चिन्हे नाहीत त्यामुळे घटकपक्ष नाराज झाले आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर मुंबई बाहेर असून, आपण शपथविधीला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला शपथविधी सोहळयाचे साधे आमंत्रणही नाही. राष्ट्रवादीला बोलावले पण आम्हाला विसरले अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment