
मुंबई : भारताच्या संभाव्य संघाची ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये २०१५मध्ये होत असलेल्या क्रिकेट विश्वचषकासाठी निवड आज मुंबईत होणार असून २०१५च्या विश्वचषकासाठी नव्या खेळाडूंना निवड समिती संधी देऊ शकते.
विश्वचषकासाठी संभाव्य संघाची आज निवड
आज दुपारी १ वाजता मुंबईत संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यीय निवड समितीची बैठक होणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली.
अंतिम संघाची घोषणा निवड समिती ७ जानेवारी रोजी करणार असून १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या काळात होणाऱ्या विश्वचषकात हा संघ खेळेल.
