विमान दुर्घटना; १० जण ठार

plane
बघोता – मध्य कोलंबियात आज एक विमान अपघातात पाच लहान मुलांसमवेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. विमान दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कोलंबिया विमानन प्राधिकरणाने सांगितले की या विमानाच्या वैमानिकाने विमान तातडीने उतरविण्याची विनंती केली होती पण विमान विमानतळापर्यंत पोहचू शकले नाही आणि विमान विमानतळापासून ८ किमी अंतरावर दुर्घटनाग्रस्त झाले. मृतांमध्ये दोन वैमानिकांसमवेत ८ प्रवासी होते.

Leave a Comment