भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण घटले

corrupt
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने या वर्षी सादर केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भातील १७५ देशांच्या यादीत भारताचे स्थान गतवर्षीपेक्षा सुधारले असून चीनला याबाबतीत मागे टाकण्यात भारताने यश मिळविले आहे. जगात सर्वाधिक कमी भ्रष्टाचार असलेला देश डेन्मार्क ठरला आहे तर भारताचा नंबर गतवर्षीच्या ९२ व्या स्थानावरून ८५ वर आला आहे. चीन या यादीत १०० नंबरवर आहे. गतवर्षी चीन ८० व्या नंबरवर होता.

यंदाच्या यादीत शेवटून पहिल्या नंबरवर उत्तर कोरिया आणि सोमालिया या देशांची वर्णी लागली आहे. पाकिस्तान आणि नेपाळ या यादीत १२६ व्या स्थानावर आहेत तर शेजारी बांग्लादेश १४५ व्या स्थानावर आहे. आपला अगदी जवळचा शेजारी भूतान या यादीत ३० नंबरवर आहे.

Leave a Comment