बीएमडब्ल्यू ‘एम४ कुपे’,‘एम३’

bmw
नवी दिल्ली – भारतीय लक्झरी मोटार बाजारपेठेवरील सेडान श्रेणीतील ‘एम३’ आणि ‘एम४ कुपे’ या स्पोटर्स कार्स जर्मनीस्थित बीएमडब्ल्यू कंपनीने बाजारात दाखल केल्या आहेत. ‘एम ३’ची किंमत १,१९,८०,००० रुपये तर एम४ कुपेची किंमत १,२१,८०,००० रुपये असून, देशभरात बीएमडब्ल्यू डिलरशिपकडे उपलब्ध झाल्या आहेत. नवीन्यपूर्ण बीएमडब्ल्यू एम ट्विनपॉवर टबरे टेक्नॉलॉजी, लाईटवेट डिझाईन आणि स्पोर्टी इंटेरिअर यामुळे या मोटारींच्या कामगिरीवर चांगला परिणाम दिसून येतो. तीन लीटरच्या सहा सिलिंडरच्या पेट्रोल इंजिनसह इंधन बचतीचाही विचार करण्यात आला असून, एम इंजिन ३१७केडब्ल्यू/४३१ अश्वशक्ती एवढे शक्तिशाली आहे. यामुळे अवघ्या ४.१ सेकंदांत ० ते १०० किमी प्रती तास वेग घेण्याची या मोटारीत क्षमता आहे. या इंजिनाची २५० किमी प्रती तास वेगाची क्षमता आहे. सुरक्षेवरही विशेष भर देण्यात आला असून, एअर बॅग्ज, ऍक्टिव डिफ्रेंशिअल, एम डायनॅमिक मोडसह डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. बीएमडब्ल्यू कनेक्टेडड्राईव्ह सेवांच्या माध्यमातून चालकाला सूचना, मनोरंजन आणि इतर सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आयड्राईव्ह ही ऑन बोर्ड ड्राईव्ह इन्फॉर्मेशन सिस्टीम, थ्री-डी मॅपसह २२.३५ सेंमीचा कलर डिस्प्ले, जीपीएस सिस्टीमसह बीएमडब्ल्यू ऍप्सच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटीवर भर देण्यात आला आहे. तसेच पुढे आणि मागे रीअर व्हू-कॅमेर्या्सह पार्क डिस्टंट कंट्रोलची यंत्रणाही यात आहे.

Leave a Comment