पुणे मेट्रोचा खेळ खंडोबा

metro
पुणे – केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुणे मेट्रोच्या मान्यतेसाठी एक बैठक बोलावली होती. या बैठकीला अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, रजनी पाटील आदी पुण्यातील खासदारांसह काही अधिकारीही उपस्थित होते. पुणे मेट्रो जमिनीवरून असावी की भुयारी या वादामुळे दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात आणि त्याचे सादरीकरण करावे, असा निर्णय जावडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Leave a Comment