चंद्रावर डीएनए दफन करा केवळ ५० पौंडात

moon
लंडन -ब्रिटीश स्पेस कन्सल्टंट एजन्सीने नागरिकांना चंद्रावर त्यांचे डीएनए दफन करण्याची सुविधा लवकरच देण्यात येणार असल्याची घोषणा केली असून त्यासाठी नागरिकांना केवळ ५० पौंड आकार भरावा लागणार आहे.

लुनार मिशन वन, ब्रिटनचे स्पाय सॅटेलाईट नेटवर्क स्कायनेट आणि युरोपियन युनियनच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम गॅलिलिओसाठी काम केलेले डेव्हीड इरॉन यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याची योजना आखली आहे. यात इच्छुक नागरिक केवळ त्यांचे डीएनएच नाही तर त्यांच्या आयुष्याशी संबंधित डिजिटल डेटाही चंद्रावर पुरून ठेवण्यासाठी पाठवू शकणार आहेत. या योजनेसाठी ५०० दशलक्ष म्हणजे ५ कोटी पौंड खर्च अपेक्षित आहे. याचाच अर्थ त्यासाठी १० लाख नागरिकांनी आपले डीएनए चंद्रावर पुरण्यासाठी पाठविण्याची तयारी दाखविणे आवश्यक ठरणार आहे. केसाच्या जाडीचा डीएनएही नागरिक पाठवू शकणार आहेत.

Leave a Comment