दर तासाला ५३ टक्के भारतीय ऑनलाईन

internet
सिंगापूर – लंडनस्थित ‘ए. टी. किर्नी ग्लोबल रीसर्च’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात तब्बल ५३ टक्के भारतीय दर तासाला इंटरनेटचा वापर करत असल्याची बाब समोर आली.

नुकताच विविध देशांमधील व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्याआधारे मांडलेला हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. भारतातील ९७ टक्के व्यक्तींनी आपण फेसबुकवर असल्याचे, तर ७७ टक्के जणांनी फेसबुकवर रोज लॉगिन करत असल्याचे सांगितले. याबाबत भारतीय जगभरातील सरासरीच्या ५१ टक्के पुढे आहेत.

हेच प्रमाण चीनमध्ये अवघे ३६ टक्के, तर जपानमध्ये ३९ टक्के आहे. जगभरातील १०इतरांच्या संपर्कात राहण्यासाठी आपण इंटरनेटचा वापर करत असल्याचे भारतातील ९४ टक्के व्यक्तींनी सांगितले. हे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. आपण आपले मत किंवा भावना शेअर करण्यासाठी ‘ऑनलाईन’ राहत असल्याचे ८८ टक्के जण म्हणाले.

Leave a Comment