सरकारी बँक कर्मचारी पुन्हा संपावर

strike
मुंबई – प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी ५ डिसेंबरला एकदिवसीय संपावर जाण्याचा इशारा दिला असून बँक कर्मचारी पगारवाढ, पाच दिवसांचा आठवडा, कामाचे कमी तास आणि अधिक संख्याबळ या मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. सुमारे दहा लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

देशाच्या विविध भागातील सरकारी बँक कर्मचारी टप्प्याटप्प्याने २ ते ५ डिसेंबर या तीन दिवसांच्या काळात संप करत असून याच पार्श्वभूमीवर दक्षिण भारतात २ तारखेला संप पुकारण्यात आला होता. आज उत्तर भारतात संप असून 5 तारखेला महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दीव-दमणमध्ये संप पुकारण्यात येणार आहे. तर मुंबईत बँक कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन केले आहे.

Leave a Comment