परिवहन सेवेत दाखल झाली बायो वेस्टवर बस

bio-bus
लंडन – बायो वेस्टवर चालणारी पहिली बस येथील सार्वजनिक परिवहन सेवेत दाखल झाली असून ही बस ब्रिस्टॉल ते बाथ दरम्यान धावणार आहे.

ही ४० सीटर बायो बस अन्न, कचरा आणि मैला यावर प्रक्रिया करून उत्पादित केलेल्या गॅसवर धावते. शहरातील प्रदूषणाच्या पातळीत त्यामुळे कपात होऊ शकेल, असा विश्वाकस ती तयार करणार्या् अभियत्यांना वाटतो.

पारंपरिक डिझेल इंजिनच्या तुलनेत या बसमधून उत्सर्जन कमी होते. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. कचर्यातवर प्रक्रिया केलेल्या गॅसवर ही बस ३०० किलोमीटरपर्यंत धावू शकते.

ब्रिस्टॉल इथे जेनको ही कंपनी हा प्रकल्प चालवते. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी ब्रिटनमधील आमची ही पहिलीच कंपनी ठरल्याचा दावा अधिकार्यां्नी केला आहे.

Leave a Comment