इजिप्तमधील न्यायालयाने पोलिसांवर हल्ला प्रकरणात बंदी घालण्यात आलेल्या मुस्लीम ब्रदरहूडच्या १८८ जणांना मृत्यदंडाची शिक्षा ठोठावली असल्याचे वृत्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूदंड ठोठावल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर इजिप्त न्यायालयांचा निषेध करण्यात येत असल्याचेही समजते. मात्र ही शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयांनी इजिप्तमधील सर्वोच्च धार्मिक अॅथोरिटी ग्रँड मुफ्ती यांचे मत विचारात घेतल्यानंतरच शिक्षा सुनावली असल्याचेही सांगितले जात आहे.
इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूडच्या १८८ जणांना मृत्यूदंड
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पोलिसांनी मुस्लीम ब्रदरहूडच्या समर्थकांच्या कँपवर हल्ला करून कॅप उध्वस्त केल्यानंतर लगेचच मुस्लीम ब्रदरहूड समर्थकांनी कैरोजवळ पोलिसांवर हल्ला करून ११ पोलिसांना ठार केले होते. मुस्लीम ब्रदरहूडचा बालेकिल्ला असलेल्या भागात हा हल्ला केला गेला होता. त्यांनी पोलिसांच्या मृतदेहाची विटंबनाही केली होती. तेव्हाच संबंधितांना पोलिसांनी अटक करून तुरूंगात डांबले होते. त्याचा निवाडा आत्ता करण्यात येत असल्याचे समजते. इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आल्याचा देशाचा इतिहासातील ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.