ए. आर. अंतुले यांचे निधन

antuley
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांचे आज वयाच्या ८५ वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात निधन झाले.

मागील काही दिवसांपासून अंतुले किडनीच्या विकाराने त्रस्त असल्यामुळे गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अत्यवस्थ असलेल्या अंतुलेची प्राणज्योत आज मालवली.

अंतुले यांच्याकडे यूपीए-१च्या काळात केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण त्यानंतर अंतुले सक्रीय राजकारणात नव्हते. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.

इंदिरा गांधी यांना आणीबाणीच्या काळात अंतुलेनी मोलाची साथ दिली होती. १९८० ते १९८२ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. अल्पसंख्यांक समाजातील पहिले मुख्यमंत्री म्हणून ते ओळखले जात होते. लोकहितासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या होत्या. एक उत्तम प्रशासक आणि खंबीर नेतृत्व गमावले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

Leave a Comment