मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरांत कोणतेही बदल न करता रेपो रेट ८ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही
मात्र अर्थव्यवस्था सध्या आश्वासक पातळीवर असल्याचे रघुराम राजन यांनी सांगत पुढल्या वर्षाच्या सुरूवातीला नव्याने आढावा घेण्यात येईल आणि स्थिती चांगली राहिल्यास व्याजदरांमध्ये आवश्यक बदल केले जातील असे देखील सांगितले.
रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारच्या दबावानंतरही व्याज दरात कपात करण्यास नकार दिला असून धनाच्या किमतीमुळे आणि सोन्याच्या आयातीत झालेल्या कमतरतेच्या पार्श्वतभूमीवर वित्तीय तूट आटोक्यात येत असल्याच्या पार्श्वरभूमीवर आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदर कपात होणार का याकडे सरकार, उद्योग आणि शेअर बाजाराचे लक्ष लागले होते.