ब्रिटनमध्ये मोहम्मद नावाची क्रेझ

names
ब्रिटन अमेरिकेसारख्या देशातून बाळ जन्माला येण्याअगोदरच त्याचे नांव ठरवून तशी नोंद प्रसूतिगृहांकडे करावी लागते. बिगर इस्लामी देशांत इस्लामी प्रतीके वापरणे हा नेहमीच वादाचा विषय ठरला असला तरी ब्रिटनमध्ये मात्र मुलामुलींची नांवे ठरविताना अरबी नावे ठरविण्यास विशेष पसंती दिली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातही मुलासाठी मोहम्मद या नावाला विशेष पसंती दिली जात आहे.

एकेकाळी ब्रिटीश जनतेला राजघराण्यातील नावांचे आकर्षण होते. हॅरी, विल्यम्स, जॉर्ज ही गतवर्षीची लोकप्रिय नांवे होती. २०१४ च्या बेबी सेंटर चार्टवर यंदा मात्र मोहम्मद, अली, उमर, इब्राहिम या अरबी नावांची लोकप्रियता वाढल्याचे दिसून आले आहे. वेबसाईटवर अशा १०० नावांची यादी दिली गेली आहे. मुलींच्या नावात मरियमला अधिक पसंती असली तरी नंबर १ वर सोफिया हे नांव आहे. गतवर्षी सोफिया याच नावाला रशिया, स्पेन, अमेरिका, ब्राझील या देशातही विशेष पसंती होती.

पारंपारिक मुस्लीम घरात पहिला मुलगा झाला तर त्याचे नांव मोहम्मद ठेवण्याची प्रथा आहे. हे नांव पवित्र मानले जाते कारण ते पैगंबराचे नाव आहे असे समजते.