सात फेब्रुवारीला यंदाची आंगणेवाडी जत्रा

bharadi-devi
मसुरे – शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असणा-या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा होणार असून ही जत्रा जाहीर झाल्यानंतर आता भाविकांना देवीच्या दर्शनाला जाण्याचे वेध लागतील. या यात्रेला अनेक व्यापारी, व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देणा-या या जत्रेत मुंबईकर चाकरमानी, राजकीय पक्षांची नेते आवर्जून उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घेतात.

यंदाच्या जत्रोत्सवात गतवर्षीच्या नियोजनात राहिलेल्या त्रुटींचा विचार करून नवीन उपाययोजना करण्यात येतील. भाविकांची गैरसोय न होता कमीत कमी वेळेत देवीचे दर्शन होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नरेश आंगणे यांनी सांगितले. या यात्रेस राजकीय नेते उपस्थित राहत असल्याने ग्रामस्थ मंडळाबरोबरच सरकारचीही या यात्रेच्या नियोजनासाठी कसोटीच लागते. या यात्रेच्या तयारीला आता जोरदार प्रारंभ होणार आहे.

राज्यात प्रसिद्ध असणारी आंगणेवाडी यात्रा विशिष्ट तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरवण्यात येतो.

Leave a Comment