भीषण अपघातात सात ठार

accident
अकोला – सोमवारी सकाळी मारुती व्हॅन आणि ट्रॅक यांच्यात अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील मुर्तिजापूरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार झाले.

मुर्तिजापूरमधील नवसार जवळ नागपूरच्या दिशेने जाणा-या मारुती व्हॅनला समोरुन येणा-या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये व्हॅनमधील सातही जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये एक महिला आणि तीन लहानग्यांचा समावेश आहे.

पोलिसांना अपघाताचे वृत्त कळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Leave a Comment