पुन्हा स्वस्त झाले पेट्रोल, डिझेल

petrol
नवी दिल्ली – रविवारी पेट्रोलच्या प्रति लीटर किमतीत ९१ आणि डिझेलच्या प्रति लीटर किमतीत ८४ पैशांची कपात सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जाहीर केली. रविवारी मध्यरात्रीपासूनच ही दरकपात लागू झालेली असून डिझेलमधील दरकपातीमुळे वाहतुकीचा खर्च कमी होऊन महागाईवर आळा घालणे शक्य होणार आहे.

पेट्रोलच्या किमतीत सातत्याने गेल्या ऑगस्ट महिन्यापासून कपात होत आहे. आतापर्यंतची ही सातवी दरकपात ठरली आहे तर, डिझेलच्या किमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यात आल्यानंतर डिझेलची ही सलग तिसरी दरकपात आहे. या दरकपातीत स्थानिक कर किंवा व्हॅटचा समावेश नसल्याने वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील कपात यापेक्षा वेगळी असेल. या कपातीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल आता ६४.२४ रुपये लीटरऐवजी ६३.३३ रुपये या दराने मिळणार आहे तर, मुंबईत पेट्रोलसाठी ७०.९५ रुपये मोजावे लागणार आहे.

Leave a Comment