निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर

share
मुंबई – सोमवारी शेअर बाजारातील निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही बाजारांमध्ये आरबीआयकडून उद्या जाहीर होणा-या पतधोरणात व्याजदर कपातीमुळे सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८,६९३.९९ या स्तरावर पोहोचला तर निफ्टी ८,६२३.०० या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला.बँकिंग, ऑटो, एफएमसीजी आणि आयटी विभागात शेअर्सची जोरदार खरेदी झाली. दरम्यान, आशियातील प्रमुख बाजारात संमिश्र वातावरण राहिले. जपान, सिंगापूर तायवान आणि इंडोनेशियातील बाजार घसरले तर चीन आणि हाँगकाँगच्या बाजारात तेजी राहिली.

Leave a Comment