जगातला सर्वात प्रचंड विमानतळ दुबईत

dubai
जगातील सर्वात मोठा विमानतळ उभारणीचे काम दुबई एअरपोर्ट अॅथॉरिटीने हाती घेतले असून त्यासाठी ३२ अब्ज डॉसर्ल खर्च येणार आहे. दुबई वर्ल्ड ट्रेड सेंट्रलमध्ये या विमानतळाचे काम सुरू झाले असून हे ठिकाण सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३० किमी अंतरावर आहे.

विमानतळ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानतळावर पाच रनवे असतील आणि ते एकाचवेळी उपयोगात आणता येणार आहेत. हे सर्व रनवे ए-३८० सारखी प्रचंड आकाराची विमाने उतरणे आणि उडविण्यासाठी उपयुक्त असतील. दुबई विमानतळ कार्पोरेट संचार प्रमुख ज्युलिअर बौमन म्हणाले की या विमानतळ उभारणीच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी प्रवासी येजा करू शकणार आहेत तर विमानतळ पूर्ण झाल्यावर म्हणजे २०२० साली हीच संख्या २० कोटी प्रवासी अशी असेल.

या विमानतळावर २०० मोठी विमाने उभी करता येणार आहेत तसेच हा विमानतळ मेट्रो नेटवर्कने जोडलेला असेल असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment