१८ आयुर्वेदिक महाविद्यालयांना केंद्राचा हिरवा कंदील

ayurvedic
नवी दिल्ली – आयुर्वेद मंत्रालयाकडून यंदाच्या वर्षी देशात १८ आयुर्वेदिक महाविद्यालयांना हिरवा कंदील देण्यात आला असून यातील तीन नवीन महाविद्यालये महाराष्ट्रात, सात उत्तर प्रदेशमध्ये आणि दोन राजस्थानमध्ये उघडण्यात येणार आहेत. सहा महाविद्यालये अन्य राज्यांमध्ये उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. देशातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी सरकारकडून आयुर्वेदालाही प्रोत्साहन दिले जात आहे.