स्मार्टफोन प्रेमींसाठी आला अॅपलचा आयपॅड एअर २, आयपॅड मिनी-३

ipad
मुंबई: जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅपलने आयपॅड एअर-२ आणि आयपॅड मिनी-३ हे दोन आयपॅड भारतात लाँच केले आहेत. आठवड्यापूर्वीच अॅप्पलने या दोन्ही टॅबलेटची ई-कॉमर्सच्या साईटवर पूर्व नोंदणी सुरू केली होती.

आत्तापर्यंतचा सर्वात कमी जाडीचा आयपॅड एअर- २ हा टॅब आहे. ६.१ मिलीमीटर इतकी याची जाडी असून त्याची स्क्रीन ९.७ इंच इतकी आहे. ८ मेगापिक्सलचा या टॅबचा कॅमेरा असून तो आयसाईट कॅमेरा आहे. यामध्ये लाईव्ह एचडीआर पॅरेनोमा सारखे अॅपलचे पेटंट असलेले अनेक फिचर्स आहेत.
आयपॅड मिनी-३ हा जनरेशनल अपग्रेड आयपॅड आहे, ज्यात रेटिना डिस्प्ले, टचआयडी आणि अनेक शानदार फिचर्स आहेत.

Leave a Comment