झोलोने आणला ओपस ३ सेल्फी स्मार्टफोन

opus
भारतात आता सेल्फी स्मार्टफोनचा ट्रेंड चांगलाच रूळला असताना झोलोने त्यांचा ओपस ३ सेल्फी भारतीय बाजारात आणला आहे. या फोनची किंमत आहे ८४९९ रूपये. या फोनला फ्रंट कॅमेरा फ्लॅश सुविधेसह दिला गेला आहे. विशेष म्हणजे हा फ्लॅश फिचर काढला तरीही फोनला उत्तम वेबकॅम दिला आहे. कमी बजेटमध्ये एक चांगला स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

पाच इंची स्क्रीन असलेल्या या स्मार्टफोनला ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ८८ अंशाचा वाईड अँगल लेन्ससह आणि फ्रंट फ्लॅशसह दिला गेला आहे. याशिवाय ८ एमपीचा रिअर कॅमेरा आहेच. ८ जीबीची इंटर्नल मेमरी, ती ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, डयुअल सिम, अॅड्राईड किटकॅट ४.२.२ ओएस अशी अन्य फिचर्स आहेत. या फोनला खास फ्लोट टास्क फिचरहरी दिले गेले आहे. त्याच्या मदतीने जादा अॅप स्क्रीनवर उघडता येतात. शिवाय मोशन कंट्रोल सेन्सरमुळे कॅमेरा, रेडिओ, गॅलरी, कॉल्स सारखी फिचर्स हातानेच ऑपरेट करता येतात.

Leave a Comment