नवी दिल्ली – एचडीएफसी बँकेने आजपासून एटीएमच्या निशुल्क वापरावर मर्यादा आणली असून आता खातेदारांना एटीएममधून महिन्यातून पाच वेळेसच निशुल्क पैसे काढता येणार आहेत. त्यापेक्षा जास्त व्यवहारासाठी वीस रुपये सेवा आकारणी आणि टॅक्स द्यावा लागणार आहे.
एचडीएफसी बँकेने आणली एटीएमच्या वापरावर मर्यादा
केवळ रक्कम काढणे याचाच या पाच व्यवहारांमध्ये समावेश नसून खात्यातील शिल्लक पाहाणे आणि छोटे खाते स्टेटमेंट घेणे यांचाही समावेश केला जाणार आहे. यासाठी ८.५० रुपये (सोबत टॅक्स) मोजावे लागणार आहेत. ही रक्कम तुमच्या खात्यातून कापली जाणार आहे. देशातील प्रत्येक शहरांमध्ये हा नियम आजपासून लागू करण्यात आला आहे.
जर एचडीएफसी बँकेचे ग्राहक दुसर्याा बँक एटीएमचा वापर देशातील सहा शहरांमध्ये (दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद) तीन व्यवहार निशुल्क करु शकतील. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी त्यांना २० रुपये मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही या सहा शहरांव्यतिरीक्त इतर शहरांमध्ये राहात असाल तर, एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डने इतर बँकेच्या एटीएममधून पाच वेळा निशुल्क व्यवहार करु शकता.