मुंबई: भाजप नेते व खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे मुंबईतच राहणार असून मुख्यालय हलवण्याबाबत कोणाताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी संजय राऊत यांचे विमान भरून पैसे आल्याचे वक्तव्य खोटे असल्याचेही सांगितले.
‘परे’चे मुख्यालय मुंबईतच राहणार – सोमय्या
लोकसभेत प्रत्येक सदस्य आपल्या विभागातल्या मागण्या मांडत असतो. ती एक व्यवस्था आहे. मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. हा मुद्दा केवळ माध्यमातून उपस्थित केला जातो असे सोमय्या म्हणाले. मी काल रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एकाद्या सदस्याने मागणी केली म्हणजे सरकारच्या मनात आहे असे नव्हे त्यामुळे यात काही तथ्य नाही. या मुद्याला कोणीतरी वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे याबाबत मला स्पष्टता करावी लागली, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली.