भालचंद्र नेमाडेंच्या भूमिकेला राज ठाकरेंचा विरोध

raj
नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी काल पुण्यातील कार्यक्रमात यांनी इंग्रजी शाळा राज्यातून हद्दपार करण्याची गरज बोलून दाखवली होती. त्यांच्या वक्तव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला असून राज यांनी मराठी शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिकवल्यास मुलांना इंग्रजी शाळांमध्ये पाठवण्याची गरजच भासणार नाही अशा शब्दात इंग्रजी भाषेची गरज बोलून दाखवली. ते नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मातृभाषेची गरज असल्याने इंग्रजी शाळा बंद करा अशी मागणीही यावेळी नेमाडे यांनी केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

Leave a Comment