भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग १४

molem
भगवान महावीर अभयारण्य- मोलेम नॅशनल पार्क
गोव्यातील भगवान महावीर अभयारण्य 1978 साली घोषित करण्यात आले असून यातच मोलेम नॅशनल पार्क समाविष्ट आहे. पट्टेरी वाघ, विविध प्रकारच्या पाली, किंग कोब्रा, दूधसागर धबधबा, तांबडी सुरळा मंदिर आणि हिरवेगार मोलेम नॅशनल पार्क ही येथील खास आकर्षणे.

भारताच्या जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात येथेच देशातील पाच नंबरचा मोठा दूधसागर धबधबा आहे. क दंब राजांच्या काळात बांधलेले तांबडी सुरळा मंदिरही येथे पाहायला मिळते. या अभयारण्यात ब्लॅक पँथर, वाघ, चित्ते, ठिपकेदार हरणे, रानकुत्री यांचे वास्तव्य आहे तसेच अतिविषारी किंग कोब‘ा, अजगर, कॅट स्नेक, व्हायपर असे सरपटणारे प‘ाणीही या जंगलाचे रहिवासी आहेत.

दूधसागर धबधब्याजवळच पाण्यामुळे तयार झालेली सैतानाची दरी ही घळ असून येथे उत्साही, साहसी ट्रेकर आवर्जून भेट देतात. येथे येण्यासाठीचा उत्तम काळ म्हणजे आक्टोबर ते मार्च हा. या काळात येथे जगभरातील पक्षीनिरीक्षकही पक्षीनिरीक्षणासाठी येत असतात. अभयारण्याची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी पाच अशी असून येथे गोवा वन विभागाने पर्यटकांच्या राहण्याची सुविधा केली आहे.

येथे येण्यासाठी जवळचा विमानतळ दोबोलीम आहे. रेल्वेने जवळचे स्टेशन पणजी. खासगी गाडीनेही येथे येता येते. राष्ट्रीय महामार्ग 4 ए वरून येऊन मोलेम येथे वळण घ्यावे लागते.

Leave a Comment