भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग १३

periyar
पेरियार अभयारण्य
केरळ राज्यातील पेरियार अभयारण्य देशातील प्रसिद्ध अभयारण्यांपैकी एक आहे.हत्तींसाठी प्रामु‘याने प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात वाघ, माकडे असे प्राणी आहेतच पण हे अभयारण्य अनेक प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध आहे. अनेक जातींची वृक्षसंपदा येथे आढळते आणि त्यातही प्रामु‘याने औषधी वनस्पतींचे प्रमाण खूपच मोठे आहे. येथे दोन हजार जातींची फुलझाडे सापडतात तशीच 170 जातींची फर्न सापडतात. गोड गवताचे येथे 169 प्रकार आहेत तर 145 विविध प्रकारची आर्किडस येथे पाहायला मिळतात. राज्यातील सर्वात मोठी नदी पेरियार येथे उगम पावते तसेच पवित्र मानली जाणारी पंभा नदीही येथेच उगम पावते.

या अभयारण्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे पेरियार सरोवर. या अभयारण्यात सध्याच्या सं‘येप्रमाणे 53 वाघ,1 हजार हत्ती आहेत. 45 प्रकारचे सरपटणारे प्राणी, दोन जातींची कासवे, तीस प्रकारचे साप, 13 प‘कारच्या पाली आहेत. तसेच 320 जातींचे पक्षी, 27 प्रकारचे उभयचर प्राणी( म्हणजे जमीन आणि पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी राहू शकणारे बेडकांसारखे, कासवांसारखे प्राणी), 38 प्रकारचे मासे येथे आढळतात.

हे अभयारण्य आकाराने मोठे असले तरी पर्यटकांसाठी केवळ 34 चौरस मीटर परिसरातच फिरण्यासाठी परवानगी आहे. याच परिसरात मानव निर्मित पेरियार सरोवर आहे. स्थानिक भाषेत याला टेक्काडी म्हटले जाते. सरोवरातून नौकाविहार करता येतो. अभयारण्याची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी सात पर्यंत असते. आक्टोबर ते जून हा काळ येथे भेट देण्यासाठी चांगला काळ आहे.जवळचा विमानतळ कोचीन आणि मदुराई येथे आहे. रेल्वेने जाणार्यांना कोट्टायम स्टेशनवर उतरावे लागते. बससेवाही उपलब्ध आहे.

अभयारण्यात राहण्यासाठी केरळ टूरिझमची रिसॉर्ट आहेत.

Leave a Comment