हुंडा घेण्याची अशीही हवीशी प्रथा

yantr
लग्नसमारंभ म्हटले की भारतात तरी वधूला आईबापांकडून काय काय दिले जाणार, वर पक्षाने हुंडा किती मागितला याची चर्चा होणारच. हुंडा घेण्यास कायद्याने बंदी असली तरी या ना त्या कारणाने ही प्रथा अजून सुरू आहे. भिवानी गावातील महापंचायतीचे संयोजक व शांतीसेनेचे प्रमुख संपूर्णसिंग हेही याला अपवाद नाहीत. त्यांचा मुलगा सनी ५ डिसेंबरला विवाहबद्ध होत आहे. संपूर्णसिंह यांनी हुंडाही घेतला आहे आणि जेवळावळीही ते घालणार आहेत. मात्र त्याबद्दल समाजाच्या कोणत्याच थरातून तक्रार किवा निषेध न होता उलट त्यांचे कौतुकच केले जात आहे.

याचे कारण म्हणजे संपूर्णसिंग यांनी मुलाच्या लग्नानिमित्त स्नेहभोजन देताना ते प्राण्यांना चारा आणि पक्ष्यांना दाणा पाणी या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला असून लग्नाच्या मेजवानीचा लाभ गाईगुरे आणि पक्ष्यांना होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे सामाजिक संस्था, खाप पंचायती, राजकीय नेते आणि समाजातील मान्यवर अशा सर्व थरातून कौतुक केले जात आहे. तसेच संपूर्णसिंग यांची सून हुंडा म्हणून गाव साफ करणारे यंत्र घेऊन येत आहे. समाजासाठी आदर्श घालून देणार्‍या या हुंड्याबद्दल अनेकांनी प्रशंसा केली असून अशा प्रकारे समाजकार्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा नव्या प्रथा समाजात रूजल्या पाहिजेत अशी आशाही व्यक्त केली आहे.

केंद्रीय वित्तराज्यमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांनीही सुंदरसिगांचे कौतुक करताना समाजाबद्दल सकारात्मक विचार करणार्‍यांचा सन्मान केला गेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Comment