सेन्सेक्स, निफ्टीत ऐतिहासिक तेजी

share-market
मुंबई – मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी सकाळच्या सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण आणि गुंतवणूकदारांकडून शेअरची जोरदार खरेदीमुळे मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने विक्रमी उसळी घेत २८ हजार ७६५.६२ या उच्चांकी स्तराला स्पर्श केला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ऐतिहासिक वाढ होत तो आठ हजार ५९१.४० या नव्या उंचीवर पोहोचला.

सेन्सेक्समध्ये सकाळी बाजार उघडताच ३२६.६१ अंकानी वाढ होत तो २८ हजार ७६५.६२ या विक्रमी स्तरावर पोहोचला तर निफ्टीनेही ९७.२० अंकांच्या वाढीसह विक्रमी कामगिरी करत आठ हजार ५९१.४० हे नवे उच्चांकी शिखर सर केले. गेल्या चार वर्षात पहिल्यांदाच खनिज तेलाचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे बाजाराचे मनोधैर्य वाढले आहे. तसेच पुढील आठवडयात रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्याकडे बाजाराचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Leave a Comment