दुधाच्या टँकरमधून दारुची वाहतूक

gokul
कोल्हापूर – कोल्हापुरमधील एका नामांकित दुध संघाच्या टँकरमधून दारुची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोव्याहून ‘बँडेड’ दारू घेऊन येणाऱ्या टँकरवर कारवाई केली असून याप्रकरणी टँकरचालक आणि क्लिनरला अटक करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील नामंकित दूध संघ म्हणून गोकुळ दूध संघ हा ओळखला जातो. या दूध संघामार्फत महाराष्ट्रासह इतर राज्यातही दूध पुरवठा केला जातो. कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघातून दररोज गोवा राज्यात दुधाचे टँकर पाठवले जातात. याचाच फायदा घेवून टँकर चालकाने एक नामी शक्कल लढवत, दुधाच्या टँकरची सहसा तपासणी होत नसल्याचा फायदा उठवित या चालकाने गोव्यातून कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात दारु वाहतूक करण्याचा उद्योग सुरू केला. दूध पिशव्या ठेवण्याच्या रॅकमध्ये मोठ्या प्रमाणात ब्रँडेड कंन्याची दारू ठेवून ती कोल्हापूरला आणली जात असे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला या गोष्टीची भनक लागली आणि त्यानुसार हायवेवर या विभागाने सापळा रचून गोकुळ दूध संघाच्या गोव्याहून येणाऱ्या टँकरला अडवून त्याची तपासणी केली. यावेळी टँकरमध्ये ब्रँडेड कंपन्यांची दारू आढळल्याने ड्रायव्हर आणि क्लिनरला ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Comment