डेलचीही भारतातील गुंतवणूक वाढणार

dell
दिल्ली – संगणक निर्माती जगप्रसिद्ध कंपनी डेल ने त्यांच्या व्यवसायाचा विकास भारतात करण्याची इच्छा प्रकट केली असून त्यासाठी भारतात अधिक गुंतवणूक करण्याची तयारी केली असल्याचे समजते. ही गुंतवणूक कंपनीचा चेन्नईजवळ पेरांबदूर येथे असलेल्या उत्पादन प्रकल्पाच्या विकासासाठी केली जाणार आहे. डेलचे वरीष्ठ अधिकारी या संदर्भात टेलिकॉम व आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांना नुकतेच भेटले असल्याचे व दोघांत यासंदर्भातली चर्चा झाली असल्याचेही समजते.

या संदर्भात माहिती देताना टेलिकॉम मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की डेल त्यांच्या इलेक्ट्रोनिक्स उपकरण उत्पादन विकासासाठी अधिक गुंतवणूक करू इच्छित आहे. कंपनीची पेरांबदूर प्रकल्पात ३ कोटी डॉलर्सची गुंतवणूक आहे व तेथे सध्या २७ हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यांना या प्रकल्पात अधिक गुंतवणूक करावयाची आहे. देशात २०१३ मध्ये आयटी हार्डवेअरची मागणी १३.३ अब्ज डॉलर्सची होती.

डेलला भारतातील गुंतवणूक वाढविण्यामागे भारताचे निर्यातसंदर्भातले असलेले स्थान अधिक महत्त्वाचे वाटते आहे.मिडल इस्ट, आफ्रिका, पूर्व युरोपात निर्यातीसाठी आशियात भारतच अधिक सोयीस्कर देश आहे. डेल भारताच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्यासही उत्सुक आहे. या कार्यक्रमात भारताने ई कॉमर्स विस्ताराचाही समावेश करावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

Leave a Comment