डिस्ने ड्रीम आईस फेस्टीव्हल सुरू

snow-palace
अँटवर्प – बेल्जियम च्या अँटवर्प शहरात नाताळनिमित्ताने भरविण्यात येणार्याे डिस्ने ड्रीम आईस फेस्टीव्हलची तयारी पूर्ण झाली असून हा महोत्सव २९ नोव्हेंबर ते ११ जानेवारी या काळात साजरा केला जात आहे.

या महोत्सवानिमित्त जगभरातील ६० कलाकारांनी बर्फाचे पुतळे तयार केले असून त्यासाठी ५०० टन बर्फाचा वापर केला गेला आहे. यंदाच्या महोत्सवात स्नोव्हाईट, अॅलीस इन वंडरलँड, स्लीपिंग ब्यूटी या बालकथांवर आधारीत बर्फाचे पुतळे तयार केले गेले आहेत. खास तयार केलेल्या आईस महालात ते मांडण्यात आले असून बर्फ पिघळू नये म्हणून या महालाचे तापमान उणे ६ अंश राखण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या काळात किमान दीड लाख पर्यटक या आईस महालाला भेट देतील असे आयोजकांकडून सांगण्यात आले. दरवर्षी येथे असा महोत्सव भरविला जातो.

Leave a Comment