मांसाहार करणा-या कुटुंबांना फ्लॅट नाकारणा-या बिल्डरांना चाप

bmc
मुंबई – मांसाहाराच्या मुद्दयावर घर नाकारणा-या विकासकांची आयओडी, सीसी तसेच जलजोडणी सुविधा स्थगित करण्याची मागणी मनसेने केली होती. या मागणीला काँग्रेस,समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह शिवसेनेनेही पाठिंबा देत हा ठराव मंजूर केला. या प्रकरणी मांसाहार विरोधी भाजपला एकाकी पाडले असून सर्वच पक्षांनी नितेश राणे यांची भूमिका उचलून धरत गुजराती, मारवाडीप्रेमी विकासकांच्या धोरणांना चांगलाच चाप लावला.

आहाराच्या पद्धती, धर्म किंवा जातीच्या कारणास्तव मुंबईतील नवीन इमारतीत घर नाकारल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. असा प्रकार कुठल्या बांधकामांत आढळल्यास बांधकाम व्यावसायिकांना आराखडे ना पसंतीची सूचना, बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र (कमेंसमेंट सर्टिफिकेट-सीसी) तसेच जलजोडणी यासारख्या आदी सुविधा स्थगित करण्याची ठरावाची सूचना मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली होती.

Leave a Comment