सरीतादेवीच्या समर्थनार्थ सरसावला सचिन तेंडुलकर

sarita
दिल्ली – भारतरत्न आणि क्रिकेट जगताचा हिरो सचिन तेंडुलकर बॉक्सर सरितादेवी हिच्या समर्थनार्थ पुढे सरसावला आहे आणि त्याने देशवासियांनाही सरितादेवीच्या समर्थनार्थ पुढे येण्याचे आवाहन केले आहे. सचिनने क्रीडामंत्री सर्वानंद सोनेवाल यांची भेट घेऊन या सरितादेवी संदर्भात चर्चा केली. या बैठकीला आलिंपिक पदक विजेती मेरी कोम, विजेंदरसिंह, भारतीय ऑलिंपिक समिती अध्यक्ष एन रामचंद्रन, बॉकिसंग इंडिया प्रमुख संदीप जजोदिया आणि बॉक्सिंग कोच जे.एस. संधू उपस्थित होते.

इंचियोन आशियाई खेळातील सेमीफायनल सामन्यात सरीतादेवीला चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावावा लागला होता त्यावर सरीतादेवीने आपले पदक परत केले होते. त्यावर आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध महासंघाने भारतीय खेळाडू सरीतादेवीने खेळाचा अपमान केल्याची प्रतिकि‘या व्यक्त केली आणि जजच्या निकालाचा निषेध केल्याप्रकरणी तिला निलंबित केले होते. यावर सरीतादेवीची बाजू घेताना सचिन म्हणाला की मीही एक खेळाडू आहे आणि सरीतादेवीच्या भावना मी समजू शकतो. बाद ठरविल्यानंतर प्रत्येक खेळाडूची प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी असू शकते आणि याच दृष्टीने सरीतादेवीकडे पाहिले गेले पाहिजे.

Leave a Comment