शरीफ यांना वगळून अन्य सार्क देशप्रमुखांशी मोदींची चर्चा

sharifmodi
काठमांडू – येथे भरलेल्या सार्क परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वगळून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशातील अन्य प्रमुखांशी बुधवारी चर्चा केल्या असल्याचे वृत्त आहे. या बाबत परदेश मंत्रालयाचे प्रवकत सय्यद अकबरुद्दीन म्हणाले की पाकिस्तान आणि भारत यांच्यात चर्चेचा प्रस्ताव दोन्ही देशांकडून आलेला नव्हता. आम्ही पाकिस्तानशी चर्चेस कधीही तयार आहोत, त्यांची तयारी असायला हवी. मात्र आज परिषदेच्या समारोपात नवाझ आणि मोदी आमोरासमोर आले तर एकमेकांची विचारपूस करतील पण त्याला चर्चा म्हणता येणार नाही.

मोदी यांनी बुधवारी भूतानचे राजे त्शेरिंग तोबगे, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगाणिस्तानचे अशरफ गनी, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे, मालदीवचे राष्ट्रपती अब्दुला यामीन यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. अफगाण राष्ट्रपतींशी बोलताना मोदींनी अफगाणिस्तानाला आवश्यक ते तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत देण्याची तयारी दाखविली व त्याचवेळी अफगाणिस्तानातील भारतीय दुतावास सुरक्षेबाबत चिंताही व्यक्त केली. त्यावर अशरफ गनी यांनी भारतीय दूतावास सुरक्षेकडे लक्ष देण्याचे वचन दिले. बांग्ला देशच्या शेख हसीना यांच्यासोबत मोदींनी सुरक्षा व दहशतवाद या विषयांवर चर्चा केली तर श्रीलंकेच्या व मालदीवच्या अध्यक्षांना राष्ट्रीय सुरक्षा सचिव त्यांच्या देशांत भेटीवर जातील त्यावेळी विविध विषयांवर चर्चा होईल असे सांगितले.

सार्कमधील भाषणात नरेंद्र मोदी यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा ठळकपणे मांडला नाही मात्र ही घटना आम्ही विसरलेलो नाही आणि विसरू शकत नाही असे मात्र बजावले.

Leave a Comment