चेन्नई सुपरकिंग्सवर बंदी आणा – सर्वोच्च न्यायालय

supreme-court
नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीने सादर केलेल्या अहवालावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आता आमच्या समोर या प्रकरणाची सत्यता आली असून आता कारवाईची वेळ आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डला (बीसीसीआय) सर्व दोषींवर कारवाई करावी व आयपीएलचा एक भाग असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची जोपर्यंत चौकशी पूर्ण हॉट नाही तो पर्यंत बंदी आणावी.

त्याचबरोबर न्यायालयाने इंडिया सीमेंट्सचे मालक यांची विस्तृत माहिती देखील मागितली असून या कंपनीत श्रीनिवासन यांच्या परिवारातील किती सदस्यांची हिस्सेदारी आहे याची देखील माहिती सादर करावी. विशेष म्हणजे या सुनावणी दरम्यान न्यायालयाने बीसीसीआयची देखील कानउघडणी केली आहे आणि ज्या लोकांमुळे बीसीसीआयची प्रतिमा डागाळली अशाना बीसीसीआयच्या निवडणुकीपासून दूर ठेवा.

Leave a Comment