गुगलने आणला स्मार्ट चमचा

spoon
नवी दिल्ली – जायंट सर्च इंजिन गुगलने त्यांच्या हाय टेक उत्पादनांत आता आणखी एका उत्पादनाची भर घातली आहे. त्यांनी लिफ्टवेअर स्पून नावाचा स्मार्ट चमचा तयार केला आहे. याचा उपयोग पार्किन्सन्ससार‘या न्यूरॉलॉजिक आजारामुळे ज्यांचा आपल्या हातांवर ताबा राहात नाही अशा लोकांना होऊ शकणार आहे. या स्मार्टस्पूनचा वापर केल्यास हात कितीही हलला तरी चमच्यातील पदार्थ खाली सांडत नाही. हेल्थ टेक कंपनी लिफ्ट लॅबने हा स्पून तयार केला असून ही कंपनी गुगलने नुकतीच खरेदी केली आहे.

हा चमचा वापरला तर हाताला कंप येत असेल तरी ती कंपने 76 टक्कयांपर्यंत कमी होतात. चमचा वापरणार्याचा हात कसा हलतो त्यानुसार चमचा आपोआप अॅडजस्ट होतो व त्यामुळे चमच्यातील पदार्थ खाली सांडत नाही. सॅन फ‘ान्सिस्को मेडिकल सेंटरच्या न्यूरॉलॉजिस्ट डॉ. जिल ओस्ट्रेम यांनीही हा चमचा बनविण्यात योगदान दिले आहे. त्या म्हणाल्या या चमच्याला फोर्क अॅटॅचमेंटही आहे. माझ्या रूग्णांसाठी हा चमचा अतिशय उपयुक्त ठरला आहे. जगात आज 1 कोटी नागरिक पार्किन्सन्स अथवा तत्सम आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना हा चमचा वरदान ठरू शकेल. विशेष म्हणजे गुगलचा सहसंस्थापक सर्जेबि‘न यांची आईही याच रोगाची शिकार आहे.

Leave a Comment