नवी दिल्ली – भारतात गुंतवणूक करण्यास अलिबाबाचे सर्वाधिक प्राधान्य राहील आणि आम्ही भारतातील छोट्या उद्योजकांबरोबर काम करण्यास फार उत्सुक आहोत अशी ग्वाही अलिबाबा या जगातील 1 नंबरच्या चीनी ईकामर्स फर्मचे संस्थापक जॅक मा यांनी एफआयसीसीआयच्या कार्यकक्रमात बोलताना सांगितले. अलिबाबाचा सप्टेंबरमध्ये आलेला आयपीओ यावर्षात आलेला जगात सर्वात मोठा आयपीओ ठरला असून यातून 25 अब्ज डॉलर्स उभे राहिले आहेत.1999 साली जॅक यांनी अलिबाबा कंपनी हाँगझौ येथे स्थापन केली आहे.
अलिबाबाचे भारतात गुंतवणुकीस प्राधान्य – जॅक मा
जॅक मा म्हणाले सध्याही आम्ही भारतातील अनेक उद्योगांबरोबर काम करत आहोत. भारतातील छोट्या उद्योजकांबरोबर काम करण्याची, भारतीय तंत्रज्ञानात सुधारणेस मदत करण्याची आणि दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करण्याची आमची तयारी आहे. दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याची ही सर्वोत्कृष्ठ वेळ आहे असे सांगतानाच त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. ते म्हणाले मी मोदींचे भाषण ऐकले आणि त्याचा माझ्यावर मोठाच प्रभाव पडला. मीही व्यावसायिक आहे आणि मोदींचे भाषण मला फारच प्रेरणादायी वाटले.
भारत हा मोबाईल फोनचा देश आहे. या क्षेत्रात ज्याच्याबरोबर चायना काम करू शकेल असा भारत एकमेव देश आहे. यामुळे दोन्ही देशांतील उद्योजकांना संधी मिळणार आहे. आमच्या वेबसाईटवर मोठ्या सं‘येने भारतीय उत्पादने आहेत आणि भारतीय चॉकलेट, मसाले चहा अशा विविध भारतीय उत्पादनांची खरेदी सुमारे 4 लाख चीनी ग्राहक करत आहेत. भारताची आणखीही बरीचशी उत्पादने चीनमध्ये विकली जाऊ शकतात. आमची कंपनी जगभरातील छोट्या उत्पादकांशी सहकार्य करण्यास प्राधान्य देणार आहे.
इंटरनेटमुळे माझे जीवन बदलले असे सांगून मा म्हणाले की इंटरनेट हा अगदी तरूण किंवा नवीन व्यवसाय आहे आणि भारतात तरूणांची सं‘या लक्षणीय आहे. भारतात इंटरनेट चांगलेच रूळले आहे आणि त्यामुळे इंटरनेटमुळे भारत बदलू शकेल असा माझा विश्वास आहे.