शिवसेनेने केली मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

shivsena
औरंगाबाद – भाजप सरकारला मराठवाड्याच्या दुष्काळावरून खिंडीत गाठण्यासाठी शिवसेना सरसावली असून पक्षाचे सर्व आमदार दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी विधिमंडळाचे अधिवेशन दणाणून सोडतील, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ‘अवघा मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे, साडेपाच हजार गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, ३८० शेतकर्यां नी आत्महत्या केल्या हे दुष्काळ जाहीर करायला पुरे नाही का,’ असा सवालही उद्धव यांनी केला. ‘आता राज्यपालांनीच पाहणी करून सरकारला दुष्काळ जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत,’ अशी मागणीही त्यांनी केली. गेले दोन दिवस दुष्काळी भागांना भेट देण्यासाठी ठाकरे पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन मराठवाड्यात आले होते. या दौर्यावच्या समारोपाच्या वेळी औरंगाबादेत एका पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली. उद्धव म्हणाले, ‘सरकारी यंत्रणा आकडेवारीत गुंतली आहे, मात्र शेतकर्यांेच्या हाती काही पडत नाही. पिके हातची गेली आहेत. डाळिंब, मोसंबीच्या बागा साफ होत आहेत, आम्ही हे सारे राज्यपालांना सांगणार आहोत.’

Leave a Comment