भूकंपाच्या झटक्यानंतर कोळसा खाणीला आग

coal-mine
बिजींग – बुधवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य झटक्यानंतर चीनच्या उत्तरपूर्वेला असणा-या लायोनिंग प्रांतातील कोळसा खाणीला लागलेल्या आगीमध्ये होरपळून २४ कामगारांचा मृत्यू झाला असून, ५२ कामगार जखमी झाले आहेत.

ही खाण फ्यूक्सिन कोल कंपनीची असून खाणीतील बचाव कार्य संपले आहे. फ्यूक्सिन कोलने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. काही जखमींची प्रकृती अजूनही गंभीर असून, त्यांना मोठया रुग्णालयात हलवावे लागू शकते अशी माहिती रुग्णालयातील कर्मचा-याने दिली.

फ्यूक्सिन शेनयांगपासून २०० कि.मी. अंतरावर आहे. जखमींना शेनयांग येथील रुग्णालयात हलवण्यासाठी तीन तासाचा वेळ लागेल. आग लागण्यापूर्वी या कोळसा खाणीजवळ १.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.

Leave a Comment