चीनी कंपनी जिओमी भारतात बनविणार स्मार्टफोन

jiomi
जगातील तीन नंबरची कंपनी बनण्याचा मान मिळविलेली चीनची जिओमी ही स्मार्टफोन कंपनी भारतात त्यांचे हँडसेट बनविणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत. या उत्पादनासाठी जिओमी चेन्नई येथील नोकिया प्लांटचा वापर करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

जिओमीचे भारतातील ऑपरेशेन हेड मनु शर्मा या संदर्भात बोलताना म्हणाले की आम्ही भारतातच आमचे स्मार्टफोन उत्पादित करण्याची शक्यता अजमावून पाहतो आहेात. यामुळे आम्हाला भारतीय ग्राहकांच्या अधिक जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी मायक्रोमॅक्सने एप्रिल २०१४ पासून त्यांचे हँडसेट भारतात बनवायला सुरवात केली आहे तसाच आमचाही प्रयत्न आहे.

जिओमीने भारतात स्मार्टफोन उत्पादनाची सुरवात केली तर ती भारतात उत्पादन करणारी पहिली चीनी कंपनी ठरणार आहे. कंपनीने त्यांच्या मी ३ व रेडमी वन एसचे भारतात आत्तापर्यंत ८ लाख फोन विकले असून नुकताच त्यांनी रिडमी नोटही भारतात लाँच केला आहे.

Leave a Comment