केरळच्या तीन जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा उद्रेक

kerala
थिरूवनंतपुरम – केरळच्या कोट्टायम, अलापुझा आणि पथनामथिट्टा या तीन जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा उद्रेक झाला असून १५ हजारांहून अधिक बदके मरण पावली आहेत. मेलेल्या बदकांच्या चाचण्या भोपाळ येथील प्रयोगशाळेत केल्या गेल्या तेव्हा या बदकांत बर्ड फ्ल्यूचा एव्हीएन फ्ल्यू एच फाईव्ह व्हायरस आढळून आला. यामुळे केरळमध्ये धोक्याचा इशारा दिला गेला असून सर्व पोल्टी फार्मवर त्यांची उत्पादने बाहेर आणण्यावर बंदी घातली गेली आहे. उद्रेक झालेल्या तीन जिल्ह्यांच्या १० किमी परिसरात ही बंदी लागू केली गेली आहे. सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासंबंधीची बैठक थिरूवनंतपुरम येथेनुकतीच पार पडली असल्याचे समजते.

या उद्रेकामुळे या परिसरातील सुमारे २ लाख बदके नष्ट करण्यात येणार आहेत. सरकारने प्रत्येक बदकपिलासाठी ७५ रूपये तर बदकासाठी १५० रूपये नुकसान भरपाई जाहीर केली असून ज्या भागात बदके मरण पावली आहेत त्या भागाला भेट देण्यासाठी केंद्रीय दक्षता पथक येणार असल्याचेही समजते. बदक पालन करणार्‍या शेतकर्‍यांनी मात्र सरकारने दिलेली नुकसान भरपाई फारच कमी असल्याची तक्रार केली आहे. आज बाजारातील बदकांची किंमत २०० ते २५० रूपये आहे आणि तोंडावर आलेला नाताळ व नवीन वर्ष सणांत हीकिंकिमत ३५० वर जाते त्यामुळे बदकामागे किमान २०० रूयपे भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

केरळात बदकांत प्रथमच बर्ड फ्ल्यूची लागण दिसून आली असून येथील शेतकर्‍यांचा बदकपालन हा जोडव्यवसाय आहे. या व्यवसायातून शेतकर्‍यांना चांगली कमाई होत असते. मात्र आता बदके मारून टाकावी लागणार असल्याने ऐन सणांत त्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.

Leave a Comment