औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला असून दुष्काळावर भाषणबाजी करण्यापेक्षा उपाययोजना करा, असा सल्ला राज ठाकरेंनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिला आहे.
भाषणबाजी करण्यापेक्षा उपाययोजना करा : राज ठाकरे
राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसेंनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. राज्यात असलेल्या दुष्काळाच्या काळात एकनाथ खडसे यांनी असे विधान करायला नको होते. दुष्काळाबाबत अशा प्रकारची वक्तव्य कोणीही करु नये, असेही राज ठाकरे म्हणाले.