काठमांडू : नेपाळमध्ये सुरू असलेल्या सार्कच्या परिषदेत पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणात दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सार्कच्या सदस्यांना एकत्र येणे गरजेचे असून प्रगतीसाठी चांगला शेजारी लाभणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सार्क देशांनी एकत्र यायला हवे – पंतप्रधान
विकासाच्या अनेक मुद्यांवर यावेळी मोदींनी भर दिला. मोदी म्हणाले, भारताने सार्कचे नेतृत्व करण्याची गरज असून भारत सार्कचे नेतृत्व करायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सार्ककडून विकासाचा जो अपेक्षित वेग हवा आहे, तो मात्र होताना दिसत नसल्याची खंत मोदींनी यावेळी बोलून दाखवली.
याशिवाय आधी झालेल्या नवाज शरीफ यांच्या भाषणात त्यांनी मोदींचा आणि भारताचा उल्लेख टाळला होता. त्याला मोदींनी चोख उत्तर देत सार्कच्या परिषदेतील सर्व देशांच्या प्रमुखांच्या नावाचा उल्लेख केला, मात्र शरीफ यांचा नामोल्लेख टाळला. तसेच पाकिस्तानचे नाव न घेता आमच्या सर्वात जवळचे शेजारी असा केला.