काठमांडू – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली असून या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या हल्ल्यात प्राण गमवावा लागलेल्या नागरिकांनाही त्यांनी आदरांजली वाहिली. सध्या मोदी सार्क परिषदेसाठी नेपाळ दौ-यावर आहेत.
ट्विटरद्वारे २६/११ हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबईवर २००८ मध्ये झालेला भ्याड दहशवादी हल्ला आजही आमच्या स्मरणात असून यामध्ये अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेले होते. ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देत इतरांचा जीव वाचवला त्यांना सलाम. ते खरे हिरो आहेत, असे मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे.