चंदा कोचर यांची कन्या आरती विवाहबंधनात

kochar
मुंबई – आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांची कन्या आरती २७ नोव्हेंबर रोजी आदित्य काझी याच्याशी विवाहबद्ध होत आहे. या विवाहानिमित्त २९ नोव्हेंबरला मुंबईच्या ताज हॉटेलात मेजवानीचे आयोजन केले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरती आणि आदित्य बालपणापासून एकमेकांना ओळखतात. मात्र दोघे अमेरिकेतील पॅनसिल्व्हनिया विद्यापीठात एकत्र शिक्षण घेत असताना त्यांचे प्रेम जमले. सध्या दोघेही रिलायन्स समुहात नोकरी करत आहेत. आरतीला फॅशनमध्ये रूची असल्याने ती रिलायन्स ब्रँडसमध्ये तर आदित्य रिलायन्स जिओ इन्फोकॉममध्ये काम करत आहे.

काझी कुटुंब अंबानी कुटुंबाच्या जवळचे मानले जाते. तर चंदा कोचर आणि आदित्यची आई राधिका या बालपणच्या मैत्रिणी आहेत.