सुट्या स्वरुपातल्या सिगरेटच्या विक्रीवर बंदी घालण्याची शिफारस

cigarate
नवी दिल्ली – सुट्या स्वरुपातल्या सिगरेटच्या विक्रीवर बंदी घालण्याची आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या एका समितीने केलेली शिफारस मंत्रालयाने स्वीकारल्याचे आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी राज्यसभेत सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने ज्या देशांमध्ये अशा प्रकारे सुट्या सिगरेटची विक्री होते तेथे अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याचे म्हटले आहे. तसेच सिगरेट स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे व्यसनाचे प्रमाण अधिक असते. भारताचा ही समावेश अशाच एका देशामध्ये होत असल्याचे संघटनेने म्हटले होते.

भारतातील सर्वात मोठी सिगरेट उत्पादन करणा-या आयटीसीच्या समभाग आरोग्य मंत्र्यांच्या या घोषणेनंतर पाच टक्क्यांनी खाली आले. मंत्र्यांच्या या घोषणेवर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment