मुंबईतील कर्मचारी-अधिकारी नागपुर विधानभवनाच्या वाटेवर

vidhanbhavan
मुंबई – मुंबईतील विधानभवन नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी हलविण्यात येत असून अधिवेशनासाठी लागणार्याय सर्व नसत्यांच्या पेट्या बांधून नागपूरकडे रवाना केल्या जात असून, कर्मचारी आणि अधिकारीही नागपुरात दाखल होताना दिसताहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हलविण्यात आलेल्या विधिमंडळाचे प्रत्यक्ष कामकाज २८ नोव्हेंबरपासूनच नागपुरात सुरू होणार असल्याने २६ पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फाईल्स आणि सामग्री पोहोचविण्याच्या दृष्टीने विधानमंडळाचे कर्मचारी कामाला लागले आहेत.

मुंबई विधानभवनातील अर्धेअधिक कर्मचारी आणि अधिकारी ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार्या हिवाळी अधिवेशनासाठी येथे दाखल झाले असून, काही वाटेवर आहेत. अधिवेशनाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या सर्व नस्त्या बांधण्याचे काम मुंबईतील विधानभवनात अंतिम टप्प्यात होते. काही कर्मचारी आणि अधिकारी नागपूरला पोहोचले असल्याने, विधानभवनात शुकशुकाट होता आणि सर्वत्र पेट्याच पेट्या दिसत होत्या. अनेक कार्यालयांना देखील कुलूप होते. येत्या २७ नोव्हेंबर पर्यंत सर्व कर्मचारी, अधिका-यांना नागपूर येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून, २८ तारखेपासून अधिवेशनाच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्याच बरोबर मुंबईतील सर्व शासकीय अधिकारीवर्ग या आठवड्यात नागपूर येथे दाखल होणार असल्याने २८ नोव्हेंबरपासून तर अधिवेशन संपेपर्यंत राज्यसरकारचे कामकाज नागपूरमधून चालणार आहे.

Leave a Comment